मनी एकच ध्यास कराडच्या जनतेचा विकास...

Image

मी कटिबद्ध प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी...

Image

मनी एकच ध्यास कराडच्या जनतेचा विकास...

मी कटिबद्ध प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी...

Image

परिचय

डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले

आमदार, कराड दक्षिण । प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा

समाजकार्यात वावरताना भावनेला कधीही अंतर न देणारे, निस्वार्थी, अत्यंत स्वाभिमानी, अभ्यासातून व्यक्त होणारे स्पष्ट विचारांचे व्यक्तिमत्व म्हणजे आ. डॉ. अतुलबाबा होय. जनता सर्वांत महत्त्वाची ! हेच त्यांचे पहिले आणि शेवटचे तत्त्व. कामाचा अविरत सपाटा, जनसेवेसाठी २४ तास उपलब्धता, प्रत्येकाच्या अडीअडचणीत मोलाचे सहकार्य, कोणालाही अंतर न देता सर्वांशी मिळून-मिसळून वागणे यासह अनेक बाबी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर टाकणाऱ्या आहेत. कितीही संकटे आली तरी शेवटपर्यंत लढा द्यायचा आणि विजय खेचून आणायचा हा त्यांचा गुणविशेष त्यांचा राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा आहे.

विचारसरणी

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना आ. डॉ. अतुलबाबा जराही मागे हटत नाहीत. उच्च शिक्षित असूनही सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्यास ते सज्ज असतात. स्वकर्तुत्वाच्या बळावर यश मिळवणे हा त्यांचा गुणविशेष सर्वांनाच भावणारा आहे. वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले असे त्यांचे पारदर्शी नेतृत्व आहे.

सोशल मीडियावर आमच्याशी संपर्कात रहा!

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विविध क्षेत्रात दिलेले
सामाजिक योगदान...

Image

आरोग्य क्षेत्रातील योगदान

कृष्णा हॉस्पीटलच्या माध्यमातून मोफत सर्वरोग निदान शिबिरांचे आयोजन, त्याचबरोबर गरजू, गरीब दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना बिलामध्ये जास्तीत जास्त सवलत दिली जाते. अपंग मुले कुपोषित मुलांना दत्तक घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना आहार वाटप केले जाते. तसेच अवघड शस्त्रक्रियाही अत्यंत अल्प दरात केल्या जातात. स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक यांना औषधोपचारामध्ये विशेष सवलत देण्यात येते. कृष्णा हॉस्पीटलच्या माध्यमातून झोपडपट्टीतील नागरीकांसाठी आरोग्यदायी दत्तक योजना राबवून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी उपाययोजना केल्या जातात. ‘कृष्णा जेष्ठ नागरिक सामाजिक सेवा संस्थे’तर्फे जेष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक मोफत सल्ला व आरोग्यदायी शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच त्यांचे वैयक्तिक स्तरावरील समस्यांचीही सोडवणूक केली जाते.

Image

शैक्षणिक क्षेत्रातील योगदान

उच्च शिक्षण व औद्योगिक शिक्षणासाठी तरुणांना प्रोत्साहनपर व मार्गदर्शक कार्यक्रम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणक ज्ञानाविषयी शिबिरांचे आयोजन. कृष्णा शिक्षण सक्षमीकरण अभियानाअंतर्गत दरवर्षी 1,00,000 विद्यार्थ्यांना मोफत वह्या व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थांना संगणकीय तसेच तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी विविध अभ्यासक्रमाची सोय असलेली महाविद्यालये, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी भविष्यात जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करुन शिक्षणाची सोय करुन दिली.

Image

सहकार क्षेत्रातील योगदान

कृष्णाकाठच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासासह सहकार क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्यात आ. डॉ. अतुलबाबा भोसले यशस्वी झाले आहे. सहकाराच्या माध्यमातून कराड दक्षिण मधील सर्वसामान्य कष्टकरी अधिक समृद्ध कसा होईल ? त्याची सर्वांगीण भरभराट कशी होईल ? याबाबीस त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिला आहे. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या आदर्श सहकाराचा वसा ते पोटतिडकीने जपत आहेत. सहकार टिकला पाहिजे आणि विशेषतः तो निकोप असला पाहिजे ही बाब ध्यानी ठेवून ते मार्गक्रमण करीत आहेत.

Image

रोजगार क्षेत्रातील योगदान

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपल्याच परिसरामध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध संस्थांद्वारे रोजगार निर्मिती ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी रोजगार अभियानांचे आयोजन करुन या माध्यमातून जवळपास पाच हजार तरुणांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वंयरोजगारासाठी व्यवसायासाठी व शेती विकासासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी ‘कृष्णा सहकारी बँकेमार्फत ’ अर्थसहाय्य उपलब्ध.

Image

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान

लोकाभिमुख उपक्रम, व्याख्याने, मेळावे, चर्चासत्रे, क्रिडा स्पर्धांचे सात्यताने आयोजन, ज्ञानवद्धीसाठी गाव तिथे ग्रंथालय ही चळवळ सातत्याने राबविण्याचा प्रयत्न, दुर्गम भागातील नागरिकांसाठी पाणी टंचाईच्या काळात कूपनलिका ( बोअरवेल) उपलब्ध करुन देऊन, गरज असेल तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध करुन दिली. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी पंढरपूर वारीला जाणा-या वारकरी बांधवांना अल्पोपहार,इतर आवश्यक साहित्याचे वाटप व गरजेनुसार आर्थिक मदतही देण्यात येते. समाजकल्याण हा विषय डॉ.अतुल भोसले यांच्या सर्व धोरणांचा व कृतीचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे हा त्यांच्यासाठी स्वतंत्र विषय नाही. कठोर परिश्रम करणारा राजकारणी अशी यांची ओळख आहे व त्यांच्या सर्व कामांमध्ये त्यांना जनतेचा आशिर्वाद लाभला आहे. नागरी भागात पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा करणे.

Image

महिला सक्षमीकरण क्षेत्रातील योगदान

कराड शहर व लगतच्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही मध्यमवर्गीय महिला या आर्थिक विवंचनेत असतात. अशा महिलांसाठी ’कृष्णा नारी शक्ती मंच’ च्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाची उभारणी व मार्गदर्शन केले जाते. बचत गटांच्या माध्यमातून विविध लघु व्यवसायाची उभारणी करुन त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. ‘कृष्णा सरिता महिला बजार’ माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या घरघुती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने स्वंयरोजगारासाठी तसेच इतर कारणांसाठी ‘कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’ द्वारे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासोबत कनेक्ट व्हा!

Facebook

Instagram

YouTube

News & updates

नवीन बातम्या आणि कार्यक्रम