BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'AI मुळे मानवजातीचा अंत होण्याची शक्यता 10 टक्क्यांहून अधिक'; अँथ्रोपिकमधील संशोधकाचा इशारा
आर्टिफिशिएल इंटेलिजन्सची इतक्या जलदगतीने प्रगती होत आहे की पुढील दशकात AI मुळे मानव जात नष्ट होण्याची शक्यता 10 टक्क्यांहून अधिक झाली आहे, असा इशारा अँथ्रोपिक (Anthropic) कंपनीतील उच्चपदस्थ सेफ्टी रिसर्चरने दिला आहे.
व्हीडिओ, मराठवाडा कोरडा, 'या' जिल्ह्यांमध्येही पावसाची दडी, कुठे, काय स्थिती?, वेळ 6,39
महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता पुढचे काही दिवस हवामान कसं असेल, कोणत्या जिल्ह्यांत पावसाची किती तूट आहे? जाणून घेऊया या व्हीडिओमध्ये
'विदेशात जाऊन मुस्लीम नेत्यांची गळाभेट घेतली जाते मग इथे गरब्यात बंदी कशासाठी' - संजय राऊत
व्हीएचपीने नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुसलमानांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच प्रवेश देताना ओळखपत्र तपासावे आणि कपाळावर टिळा लावणं अनिवार्य करावं, असंही म्हटलं आहे.
बॉसच्या नंबरवरून मेसेज, थेट 1.5 कोटींची मागणी; काय आहे हा 'बॉस स्कॅम'?
या प्रकरणाच्या तपासात मिळालेल्या सुमारे 4500 सिम कार्डच्या माहितीच्या आधारे अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांनी 26 राज्यांमधील 251 एनसीआरपी तक्रारींचे विश्लेषण केले.
होर्मुझमध्ये अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा हल्ले सुरू, सौदीवर हूतींचे हल्ले: भारताच्या अडचणी का वाढू शकतात?
पर्शियन गल्फमधील अमेरिका-इराण संघर्ष आणि येमेनमध्ये सौदी अरेबिया व हूती यांच्यातही संघर्ष सुरू आहे. तसेच, रशिया-युक्रेन युद्धही सुरूच आहे.
MPSC : 'आम्ही शेतकऱ्यांची लेकरं, नाईलाजानं रस्त्यावर उतरावं लागतंय'; विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी एमपीएससी विद्यार्थी आंदोलनं करत आहेत. 7 सप्टेंबरला पुण्यात, 8 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आज (9 सप्टेंबर) नागपूर आणि नाशिकमध्ये होत आहे.
दिसायला फिट असणाऱ्या तरुणांमध्येही 'हार्ट अटॅक' का वाढतोय? हृदयविकार तज्ज्ञांनी सांगितलं कारण
पूर्वी 'हार्ट अटॅक' हा शब्द ऐकला तरी डोळ्यांसमोर एखादी वयस्कर व्यक्तीच यायची. पण आता चित्र वेगाने बदलत चाललं आहे. आजच्या तरुणांमध्येही हे प्रमाण वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे.
युकेच्या एका निर्णयाने इस्रायल का भडकला? वेस्ट बँकचा वाद नेमका काय आहे?
जॉर्डन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील भूभागाला वेस्ट बँक म्हटलं जातं. या भूभागाच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेला इस्रायल आहे. तर पूर्वेला जॉर्डन आहे.
'मेटा'कडून भारतात बाललैंगिक शोषणाशी संबंधित जाहिराती अजूनही सुरूच; नव्या अहवालातून गंभीर माहिती समोर
बीबीसीच्या तपासानंतर, बालहक्कांसाठीचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह भारतातील अनेक सरकारी संस्थांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, चुरपे : लडाखमध्ये कसं बनवलं जातं जगातलं सर्वोत्तम चीज? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 12,46
भारताच्या लडाखमध्ये याकचं दूध वापरून तयार करण्यात येणाऱ्या 'चुरपे' चीजला जगातल्या सर्वोत्तम चीजचं बक्षीस मिळालंय.
व्हीडिओ, 'आम्हीही जीव वाचवू शकतो', कोल्हापुरातील ट्रान्सजेंडर पथक - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 5,35
कोल्हापुरात 15 ट्रान्सजेंडर व्यक्ती आता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेत आहेत. पूरस्थितीत बचावकार्य, शोध आणि सुटका, प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापनाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय.
व्हीडिओ, धाराशिवसह 'हे' जिल्हे कोरडेच, पावसाचा अलर्ट कुठे कुठे?, वेळ 4,57
राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. पुढचे काही दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या
व्हीडिओ, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?, वेळ 4,01
बीडच्या केजमधील साने गुरुजी निवासी विद्यालयाची जबाबदारी कविता गित्तेंवर आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
व्हीडिओ, भाषेतली श्लील-अश्लीलता कोण ठरवतं? तुमच्या मनातील समज-गैरसमजाची उत्तरं डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्याकडून, वेळ 1,09,54
भाषेतली श्लीलता आणि अश्लीलता नेमकी कोण ठरवतं? ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संदर्भातून या प्रश्नाचा वेध घेतात.
व्हीडिओ, भारतीय संविधानाने मनुस्मृतीचा पराभव कसा केला? - यशवंत मनोहर यांची मुलाखत , वेळ 44,02
या विशेष मुलाखतीच्या मालिकेत महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भारतीय समाज व संविधानातील महत्त्व यशवंत मनोहर यांनी स्पष्ट केलंय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.




































































