शेवटचा भाग १० – आज रोख…!

‘एक साधारण आपल्या दिवसाची सुरुवात कशी व्हावी?’ ह्याबद्दल प्रत्येकाच्या काही अशा ठराविक कल्पना असतात. सगळ्यांच्याच असतात ह्यात वादच नाही! कुणाला बेड-टी दिल्यास मजा येत असते. कुणाला लगेच नाश्ता हवा असतो. कुणाला, आधी कधी एकदा व्यायाम उरकतोय असं झालेलं असतं. काहींना दिवसाची सुरुवातच होऊ नये आणि तसेच पडून राहू बिछान्यात असंही वाटत असतं. मात्र पंखा चालू,... Continue Reading →

भाग ९ – पेमेंट गेटवे…

“ऑफिसमधून निघालोय! एक अर्ध्या तासात ओरायझन मॉलला पोहोचतोय. तू निघ आता घरून, म्हणजे पोहोचशील मी येईपर्यंत!” मंगेशने मनिषाला निरोप देत फोन ठेवला. शहरातल्या काही बड्या, आलिशान जागांपैकी ‘ओरायझन मॉल’ ही एक अशीच भव्य जागा होती. बेसमेंट धरून सहा मजले असलेला हा मॉल शहरातल्या बहुदा सगळ्यांसाठीच आकर्षण होता. फुड कोर्ट, मल्टिप्लेक्स आणि विविध देशी-विदेशी कंपन्यांची दुकानं... Continue Reading →

भाग ८ – मॉर्गेज

टळटळीत दुपार! एव्हाना मार्च असला तरीही बारा वाजता ऊन जाम तापलेलंच! सुट्टी असेल तर सामान्य माणसाने अशा वेळेस गपचुप घरात पुस्तक वाचत पडावं हे इष्ट, नाही का? पण ह्या अशा वेळी एवढा आततायीपणा करत, भर उन्हात इकडे तिकडे फिरायची काय गरज होती, हा प्रश्न होताच! पण पुन्हा तेच. प्रश्न तत्त्वाचा असला की इतर सारं काही... Continue Reading →

भाग ७ – पर्सनल लोन…!

“अशी कुठली medical emergency असते रे, जी तुम्हाला कुणाचा फोन आला की बरोब्बर हॉस्पिटल मध्ये बोलावते आणि जऽरा म्हणून वीकेंड मिळाला की, गाड्या घोडे विकत घेऊ देते. गेला बाजार, एखादं anniversary surprise देऊन जाते बायकोला, आणि काहीच जमलं नाही ह्यातलं, तर थेट २०० किमी वर असलेल्या कुठल्याशा गावाला, सहकुटुंब, सहपरिवार प्रवास वगैरे करू देते! अरे... Continue Reading →

भाग ६ – मेडिक्लेम…!

संध्याकाळी ५ वाजता अखेरीस बायको आणि मंगेशची स्वारी एकदाची घरी पोहोचली. बिल्डिंगच्या बेसमेंट मधे जागा असण्याचा संबंधच नव्हता! म्हणून मग शेजारच्या बिल्डिंगमधल्या, आपल्या परदेशी स्थायिक असलेल्या मित्राच्या जागेत गाडी पार्क करून दोघे फाटकातून आत शिरले. नवी गाडी पार्क करताच आराम संपला होता आणि लिफ्ट नसल्याने जिने पायीच चढावे लागणार होते. कसं असतं ना, माणसाला ऐशो-आरामाची... Continue Reading →

भाग ५ – डिमॉनेटायझेशन

सकाळपासूनच आज त्याचा मूड अजिबात नव्हता! अहो, कसा असेल? बाहेर पहावं तर अगदी ऐन थंडीत झालेलं ढगाळ वातावरण. ‘झक मारली आणि आज सुट्टी घेतली’ असं झालं त्याला! सकाळी गोधडीत जास्त वेळ लोळता आलं, इतकंच काय ते समाधान! मग जरा साडे दहा अकराला, बाहेर जाऊन एक दोन बँकेची आणि कधी नव्हे ते आईने मागे केव्हातरी आणायला... Continue Reading →

भाग ४ – डेबिट कार्ड…

काल चॅट करता करता ठरवल्याप्रमाणे, दोघांनी, ते केवळ उच्चभ्रू लोकांचीच वर्दळ असलेलं कॉफीशॉप गाठलं. तेही तिथल्या कॉफीला चव असल्यामुळे नव्हेच हो! ‘पैसे - आहेत म्हणून खर्च करणे’ आणि ‘पैसे असल्यावर, ते कशावर खर्च करावे? ही अक्कल असणे’ ह्यातला नाजूक फरक बऱ्याच जणांना जन्मतः आणि नंतर बऱ्याच काळापर्यंत उमगत नसल्याने हे असं घडत असतं. काही वेळा... Continue Reading →

भाग ३ – यू.पी.आय.

घर भाड्याचंच असलं तरीही त्याने ते इतकं नीटनेटकं ठेवलं होतं की बघणाऱ्याला आश्चर्य वाटायलाच हवं. नोकरीच्या गेल्या चार पाच वर्षात त्याने ह्याच घरात ठाण मांडलेलं होतं म्हणा! त्यामुळे पडदे व्यवस्थित बांधलेले, एका स्टॅंड वर सगळे कपडे नीट वाळत घातलेले वगैरे दृष्य इथे नेहेमीची! किचन मध्ये नुकतीच बाईने येऊन भांडी घासून ठेवली होती, ती आता रॅक... Continue Reading →

भाग २ – डिस्बर्समेंट…

नेहमीप्रमाणे ६.३० वाजताचा गजर वाजला! खिडकीतून येणाऱ्या अंधूक प्रकाशात चाचपडत त्याने डाव्या हाताने तो गजर अंदाजानेच कसातरी बंद केला. पुन्हा चाचपडतच शेजारी असलेल्या ड्रेसिंग टेबलवरचा चश्मा डोळ्यांना लावला. लग्नाला जेमतेम एक वर्ष होत आलेलं. त्यामुळे ह्या गुलाबी काळातला अताशा सवयीचा झालेला, आपल्या बायकोच्या हाताचा स्पर्श त्याला जाणवला. तिला जाग येणार नाही ह्या खबरदारी घेत, तो... Continue Reading →

भाग १ – क्रेडिट कार्ड…!

"तेजूऽऽऽऽऽ." त्याने खालूनच हाक मारली. मेनरोडच्या जरा ऑफ अशी ती एक स्टँड-अलोन इमारत होती. एक साधारण १०-१२ वर्ष जुनी असल्याची कबुली तिच्यावर ठिकठिकाणी रंगलेल्या, वॉटर-प्रूफिंगच्या रेघोट्या, केव्हाच देऊन मोकळ्या झाल्या होत्या. तरीही तिच्यातली प्रत्येक खिडकी आश्चर्यकारक रित्या फुलझाडांनी सजलेली होती, ही खरंतर विलक्षण कौतुकाची बाब! रस्त्यावर संध्याकाळच्या साधारण चार-साडेचारच्या सुमारास अपेक्षित असेल इतकीच तुरळक वर्दळ!... Continue Reading →

शेवटचा भाग २० – *अटी लागू…!

“आत येऊ?" त्याने तिच्या रूमच्या दारावर नॉक करत विचारलं. "एक एक मिनिट थांब केदार! मी चेंज करतेय! एकच मिनिट." आतून गायत्रीचा आवाज आला. "हां! ये आता, उघडच आहे दार. लोटलं होतं फक्त." दार ढकलून केदार आत शिरला. अगदी साध्या होम वेअर टी-शर्ट मध्ये गायत्री उभी होती, इतका वेळ दातात धरलेली दातेरी पिन, तिने हाताने धरून... Continue Reading →

भाग १९ – सॉर्टेड…?

आज पल्लवीचा नेहमी असायचा तसा, सातचा गजर गायत्रीने कित्येक वेळा snooze केला होता. पण कुणासाठीच न थांबणारा सूर्य एव्हाना वर येऊ लागला होता. खिडकीला असणारा पडदा नेमका काल झोपताना लावायचा राहिला असल्यामुळे, वर आलेल्या सूर्याने आपल्या किरणांचा मोर्चा खिडकीतून डायरेक्ट गायत्रीकडे वळवला होता. तेही थेट तिच्या चेहऱ्यावर! उत्तरायणातल्या सूर्याची प्रखर किरणं थेट डोळ्यांवर पडल्यामुळे गायत्रीला... Continue Reading →

भाग १८ – कँडिड…!

रूममधे लॅपटॉपवर काहीतरी करत बसलेल्या केदारचं अजिबात इथे तिथे लक्ष नव्हतं. कानात असलेल्या कॉर्ड्स अणि सवयीप्रमाणे बंद असलेलं खोलीचं दार, हे सगळं त्याच्या ह्या कॉन्सन्ट्रेशनला पूरकच होतं. बाहेर मात्र गायत्री कसल्यातरी विशेष गडबडीत होती. रविवार संध्याकाळचे साडे-चार वाजलेले भींतीवरच्या घड्याळात दिसत होते. त्यात अचानक त्याचा फोन वाजला. चमकून त्याने स्क्रीनकडे पाहिलं. स्क्रीन वर ‘Gayatri’ हे... Continue Reading →

भाग १७ – री-एन्ट्री?

संध्याकाळच्या सहाचा सुमार. आणि सुमारच होतं आज क्लायमेट. भंगार एकदम! म्हणजे अगदीच वाईट्ट! ढगाळ तर सकाळपासूनच झालेलं आणि त्यातच, ‘आत्ता येतो की नंतर’ अशी हुलकावणी देणारं पावसाळी फीलिंग! कंटाळा पूर्ण शहरभर आच्छादलेला. अतिशयोक्ती म्हणा किंवा काहीही, पण आपल्याला आपलं सगळंच महत्त्वाचं वाटतं आणि तसंच ते इतरांना ही वाटायला हवं असंही वाटत राहतं. ह्याला ‘ईगो’ असंही... Continue Reading →

भाग १६ – थांब ना…

त्या २ BHK घरातल्या हॉल आणि किचन वगळता ज्या इतर दोन रूम्स होत्या, त्या दोन्ही रूम्सच्या मधोमध जो एक अदृश्य पडदा दोघांनी स्वतःहून लावून घेतला होता तो नक्कीच काम करत होता. दोघेही नियमांबद्दल तितकेच कर्मठ, तितकेच निष्ठावान. एक, दुसऱ्याच्या स्पेस मध्ये डोकावत नाही, दुसरा पहिल्याच्या स्पेस मध्ये पाहतही नाही. जेवायलाच काय ते दोघे एकत्र! बाकी... Continue Reading →

भाग १५ – डोकेदुखी…

कानाला लावलेला फोन सांभाळत तो वॉलेट मधून कॅश काढत कसल्यातरी खोल विचारात उभा असलेला दिसला. खांद्याचा आधार घेत, फोन मानेवर रेस्ट करत त्याचं काहीतरी विचित्रच चाललेलं होतं. अजिबात लक्ष नसल्यासारखं. काऊंटर मागे त्याच्यासमोर उभा असलेला केमिस्ट सुद्धा त्याच्याकडे आतूर नजरेने पाहत उभा होता... मात्र तो फोन करत असलेली व्यक्ती अजिबातच फोन उचलत नसल्याचं पाहून शेवटी... Continue Reading →

भाग १४ – वन डाउन…

संध्याकाळची वेळ. शहरातलं एक नहमीच गजबजलेलं देऊळ. पण हे देऊळ ज्या देवाचं होतं, त्याचा आज वार नसल्यामुळे तिकडे कोणी फारसं फिरकलं नव्हतं. त्या फारशा भव्य-दिव्य आणि एकंदरच अजिबात अवडंबर नसलेल्या देवळात त्याने त्याच्या नेहमीच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि देवासमोर हात जोडून उभा राहिला... डोळे उघडून जायला वळणार इतक्यातच, “काय मागितलंस?” असं वाक्य त्याच्या कानावर आदळलं.... Continue Reading →

भाग १३ – सवय!

किचन मधे शिरता शिरताच तिला कसलासा वास आला! बेसिन मधे पाणी घालून ठेवलेलं, मॅगी बनवलेलं पातेलं पाहिलं आणि काहीशा आश्चर्याने हातातला टूथब्रश नॅपकीनला पुसत तिने एकदा केदारच्या रूमकडे कटाक्ष टाकला. दार बंद असलं तरीही किलकिलं उघडून तिने तो आत नसल्याची खात्री करून घेतली. तोंड पुसून गायत्री पुन्हा चहा टाकण्यासाठी किचनमधे शिरली. टेबलवर कधीच न दिसणारं... Continue Reading →

भाग १२ – सफर…!

गेल्या काही रात्री दोघांसाठीही भयंकर समाधानाच्या होत्या! नाही, नाही, अहो! भलताच विचारही नको! त्यांच्यात ‘तसं’ काहीच घडलं नव्हतं! नाकासमोर चालणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींमध्ये फक्त एकाच आठवड्यात तसं काही होण्याचा प्रश्नच नव्हता! हां! पण ह्या सुखा-समाधाना मागचं कारण एकच होतं! म्हणजे - गायत्रीला कुणीतरी सोबत असल्याची जाणीव असल्यामुळे शांत झोप लागणं. आणि त्याला झोपायला मनासारखी जागा... Continue Reading →

भाग ११ – कस्में वादें

रूम शेअरिंगच्या ह्या अनोख्या प्रयोगात आज पहिलाच नीट वीकेंड उजाडला होता. एकत्र शिफ्ट झाल्यापासून रोज फार कमी वेळ एकमेकांशी बोलायची संधी मिळालेली लोकं आज आणि उद्या अख्खे दोन दिवस एकत्र एकाच घरात असणार होती. वीकेंड असल्यामुळे आणि त्याहून दोघांनाही सुखाची झोप लागल्यामुळे, दोघांचाही दिवस उशीराच सुरू झाला. ठरवून सगळं काही ठेवलं होतं. आपणच आपल्या भोवती... Continue Reading →

Website Powered by WordPress.com.

Up ↑

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया