स्टेशन…!

Image

त्या स्टेशनचं एकंदर स्थापथ्य म्हणजे आर्किटेक्चरंच असं काहीसं होतं की तुम्ही कोणत्याही बाजूने या – जीना चढल्याशिवाय काही तुमचा कार्यभाग साध्य होणं शक्य नव्हतं. कुठल्याही बाजूने फुट-ओव्हर-ब्रिज – किंवा रेल्वेच्या भाषेत सांगायचं झालं तर, FOB वर पाय ठेवल्याशिवाय स्टेशन वर पाऊल ठेवणं शक्य नव्हतं. दररोज सकाळी, तो आपल्या खांद्यावर रुळणाऱ्या लॅपटॉप बॅगचा इतरांना धक्का लागू … स्टेशन…! वाचन सुरू ठेवा

ओळख…

Image

"लग्न आहे आज... चला!" तो खुर्चीवरून उठत म्हणाला. "ते गेट-पासचं बुकलेट कुठे आहे रे?" टीम मधला कुणीतरी उत्तर देईल ह्या अपेक्षेने त्याने जनरल असा प्रश्न केला. उत्तर सोडाच, पलिकडून महेशचा खुडबुड खुडबुड असा आवाज मात्र ऐकू आला. "अरे काय राव सांगत नाहीस... चायला लाज वाटते का असं परस्पर न सांगता..." महेश समोरच्या क्यूबिकल मधून उठून … ओळख… वाचन सुरू ठेवा

सुगंधाची बाराखडी…

Image

ह्या अखंड जगाची भाऊगर्दी निर्माण करता करता त्या बिचाऱ्या ब्रह्मदेवाला काय कष्ट पडले असतील ह्याचा विचार करायला काही वेगळी कल्पनाशक्ती लागेल असं काही जरुरीचं नाही! मात्र त्याच्या कल्पकतेचा खरा कस लागला असेल ते खरंतर ही एक गोष्ट निर्मिताना! अगदी माणूस बनवायला सुद्धा इतका वेळ आणि विचार करावा लागला नसावा त्याला! फुलं! आणि त्यातल्या त्यात स्वतःचा … सुगंधाची बाराखडी… वाचन सुरू ठेवा

डेऽट…भाग – २

Image

“तीन महिने लागले आपल्याला इथवर यायला! इमॅजिन! मी तर आशाच सोडून दिली होती.” कुठल्याशा एका शनिवारच्या संध्याकाळी मानस फोनवर बोलत होता. “मी येतो तुला घ्यायला, एकत्र जाऊया ना?” “नाही नको, तू डायरेक्ट ये. उगाच वळसा पडेल तुला लांबचा.” तनया म्हणाली. पलिकडून तनयाच्या आजुबाजूला जोरात आवाज येत होता. “ऐक ना, इथे बाहेर काहीतरी काम सुरू आहे, … डेऽट…भाग – २ वाचन सुरू ठेवा

डेऽट…भाग – १

Image

ऑक्टोबर अगदी नुकताच सुरू झाला असला म्हणून काय झालं? ऑक्टोबर हीटची सगळी उष्णता, अगदी ‘मी’ म्हणत होती आणि त्यातल्या त्यात इथे तर फारच! शेवटी मीटिंग रूम म्हणली की चार भिंती आल्या, खेळत्या हवेचा अजिबात तुटवडा आला! आणि त्यातल्या त्यात एसी सुरू नसेल तर आली ना कंबख्ती! पण आज इथे तक्रारीला वाव नव्हता! कंपनीच्या त्या फॉर्मल … डेऽट…भाग – १ वाचन सुरू ठेवा

आजचा रंग – ‘लाल’

Image

कुठलंही नेहमीचं ऑफिस असावं, दिसावं तसं ऑफिस! प्रत्येक क्यूबिकल किंवा डेस्कवर डेस्कटॉप किंवा लॅपटॉप च्या उजळलेल्या स्क्रीन्स दिसत होत्या. "आज जोरात आहेस एकदम..." तो मात्र फोन वर टाईप करत मनाशीच म्हणाला. म्हणता म्हणता मेसेज सेंडही झाला होता. फोन खाली डेस्क वर ठेवतो ना ठेवतो तोच मेसेजचा टोन वाजला. अरे वाह! आज कधी नव्हे ते ‘तिने’ … आजचा रंग – ‘लाल’ वाचन सुरू ठेवा

विरहवाली – २

Image

फाटक उघडून तो काहीसा भीतभीतच आत शिरला. बंगला अपेक्षेइतकाच सुरेख होता! बाहेर झोपाळा. शेजारी बसायला, लाकडी पॉलीश असतं ना गडद रंगाचं, तसला रंग लावलेले दोन बाक. त्यापुढे एक लाकडी, चकचकीतपणा राखलेला टी-पॉय! सभोवार फुलाबिलांची झाडं, काही अंशी थोडं लॉन वगैरे! ती सुरम्य बाग निरखतच तो दारापाशी आला. बेल वाजवली. बेल कसली, साग्रसंगीत दोरी लगडली होती … विरहवाली – २ वाचन सुरू ठेवा

विरहवाली – १

Image

इतर दिवसांसारखाच अजून एक दिवस. हां! फरक इतकाच की आज वीक-डे असूनही कसलीशी सुट्टी आलेली होती. तीही बुधवारी, आठवड्याच्या अगदी मधोमध. त्यामुळे जोडून बिडून सुट्टी मारणाऱ्या बिलंदरांची मात्र सफाईदारपणे पंचाईत झालेली. विशेष काहीच करता येणार नसल्याने बहुतांशी लोकांनी, आरामात घरी झोपून राहण्याचा पर्याय स्वीकारला असावा, हे जाणवण्या इतपत कमी गर्दी होती आत्ता रस्त्यावरती. वेळ सकाळची … विरहवाली – १ वाचन सुरू ठेवा

टेबल लँप…

Image

टेबलावरच शेजारी ठेवलेल्या मोबाईल मध्ये दररोज प्रमाणे रात्री ११.३० चा चौथा अलार्म वाजला आणि तिने हसतच तो लेफ्ट स्वाइप करून बंद केला! काहीसं मनाशीच हसत तिने एकदा त्या मोबाइल स्क्रीनकडे उपहासाने पाहिलं. एखाद्या वीराने रणांगणी आपण नुकत्याच हरवलेल्या शत्रूकडे पहावं अगदी तसं! कितीतरी दिवसांनी तिला आज ह्या अलार्मचं गमक जमलं होतं! एकदाही अलार्म स्नूझ न … टेबल लँप… वाचन सुरू ठेवा

कविता…

Image

कसं असतं ना? प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असं ‘ट्रिगर’ असतं ज्या करवी तो किंवा ती, ह्या ‘शीर्षकाच्या’ वाट्याला जातो/जाते. तसंही हल्लीच्या अर्ध्याहून जास्त कवींच्या आयुष्यात ‘विरह’ नावाचा ‘कलि’ येतो आणि त्याचं हे असं ‘कलियुग’ सुरु होतं. किंवा मग कुणाचं कुणावर प्रेम बीम जडतं, आणि मग आयुष्यात खूप काही घडतं/बिघडतं. काहींना निसर्ग भुलवतो, काहींना प्रियकर झुलवतो. … कविता… वाचन सुरू ठेवा